गुगल किंवा जीमेल अकाउंट कश्या प्रकारे ओपन करावे ? | How To Open Gmail and Google Account ?
नमस्कार मित्रांनो आजचे युग हे डिजिटल आहे. आणि या डिजिटल युगामध्ये सोशल मिडीयाचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. याचे उत्तम आणि ताजे उदाहरण सांगायचे झाल्यास Whatsapp, Facebook, आणि Twitter इ सोशल मिडीयाचा वापर होत असतांना आपल्याला दिसत आहे. असे असले तरी आज सुद्धा इमेल ला खूप महत्व आहे. आणि तुमच्या कडे इमेल अकाउंट नसेल तर तुमच्या कडे इमेल अकाउंट असणे आवश्यक आहे. तर आपण आज एक इमेल अकाउंट जीमेल वर कश्या प्रकारे तयार केला जातो हे पाहणार आहोत. त्यासाठी तुम्हाला खालील स्टेप फॉलो करायच्या आहेत.
Step 1 :- सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईल किंवा संगणक वरील एक कोणतेही ब्राउजर ओपन करायचे आहे. त्या नंतर तुम्हाला ब्राउजर च्या Address Bar मध्ये www.google.co.in असे टाईप करून Enter करायचे आहे. त्या नंतर Google च्या Search Box मध्ये email account असे टाईप केल्या नंतर तुमच्या समोर एक विंडो ओपन होईल ती खालील प्रकारे दिसेल. पहिल्याच साईट वर क्लिक करावे.
Step 2 :- पहिल्या साईट वर क्लिक केल्या नंतर तुमच्या समोर एक नवीन विंडो ओपन होईल त्यावरील तुम्हाला खाते तयार करा. (Create New Account) यावर क्लिक करून त्या नंतर माझ्या स्वतःसाठी यावर क्लिक करायचे आहे.
Step 3:- वरील प्रक्रिया केल्या नंतर तुमच्या समोर खालील प्रकारे एक अजून नवीन विंडो ओपन होईल त्यामध्ये तुम्हला तुमचा नाव, आडनाव तसेच वापरकर्ता नाव म्हणजेच Username टाईप करायचे आहे. हे लक्षात ठेवा कि जो तुम्ही Username ठेवणार आहात तोच तुमचा Gmail Id असणार आहे. त्यानंतर तुम्हाला पासवर्ड टाईप करून पुढील बटन वर क्लिक कराचे आहे.
Step 4:- वरील प्रक्रिया केल्या नंतर Google तुमचा मोबाईल नं. सत्यापित करेल त्या साठी Google कडून तुमच्या मोबाईल नं. वर ६ अंकी एक कोड पाठविण्यात येईल. त्यामुळे खालील फोटोत दाखवल्या प्रमाणे मोबाईल नं. टाकून पुढील बटन वर क्लिक करा.
Google तुमच्या मोबाईल नं. वर पाठवलेला ६ अंकी कोड टाकून तपासणी करा यावर क्लिक करावे.Step 5:- वरील प्रक्रिया केल्या नंतर तुम्हाला तुमची जन्म तारीख व लिंग निवडून घ्यावे. व पुढील बटन वर क्लिक करावे.
Step 6:- वरील सर्व प्रक्रिया केल्या नंतर खालील फोटो मध्ये दाखवल्या प्रमाणे कृती करा.
Step 7:- होय, मी सहभागी होत आहे यावर क्लिक केल्या नंतर तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल त्या पेज वरील मला मान्य आहे. यावर क्लिक केल्या नंतर तुमचे अयशस्वी रित्या जीमेल चे अकाउंटओपन होईल
अश्या प्रकारे तुम्ही जीमेल अकाउंट ओपन करू शकता, जर तुम्हाला अजून सुद्धा काही अडचणी येत असतील तर तुम्ही खालील Video सुद्धा पाहू शकता.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: