मुख्यमंत्री - माझी लाडकी बहिण योजना
Mazi Ladaki Bhahin Yojana
आज सर्वत्र सर्वात जास्त चर्चा असेल तर ती मुख्यमंत्री - माझी लाडकी बहिण योजनेची तर आपण आज या योजनेचा फॉर्म कसा भरावा या बाबत माहिती जाणून घेणार आहेत. त्यासाठी तुम्हाला खालील स्टेप फॉलो करावा लागतील. त्या अगोदर पुढील माहिती लक्षात असू द्या.
योजनचे स्वरूप
प्रत्येक पात्र महिलेल्या तिच्या स्वतः च्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात DBT द्वारे दरमहा रु. १५००/- एवढी रक्कम दिली जाणार आहे.
योजनेचे लाभार्थी :-
महाराष्ट्र राज्यातील २१ टे ६५ या वर्ष वयोगटातील विवाहित , विधवा, घटस्फोटीत, परीत्यक्ता आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला.
पात्रता :-
1) महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक आहे.
2) किमान वयाची २१ वर्ष पूर्ण व कमाल वयाची ६५ वर्ष पूर्ण होईपर्यंत.
३) राज्यातील विवाहित , विधवा, घटस्फोटीत, परीत्यक्ता आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला.
४) लाभार्थ्याचे स्वतः चे आधार लिंक असलेले बँक खाते असावे.
५) लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. २.५० लाखापेक्षा जास्त नसावे.
आवश्यक कागदपत्रे :-
- आधार कार्ड
- अधिवास प्रमाणपत्र, प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर महिलेचे ( १५ वर्षापूर्वीचे रेशन कार्ड / १५ वर्षापूर्वीचे मतदान ओळखपत्र / जन्म प्रमाणपत्र / शाळा सोडल्याचा दाखला ) यापैकी कोणतेही एक.
- महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास पतीचे (अधिवास प्रमाणपत्र / १५ वर्षापूर्वीचे रेशन कार्ड / १५ वर्षापूर्वीचे मतदान ओळखपत्र / जन्म प्रमाणपत्र / शाळा सोडल्याचा दाखला ) यापैकी कोणतेही एक.
- उत्पनाचे प्रमाणपत्र ( उत्पनाचे प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यास पिवळे रेशन कार्ड किंवा केशरी रेशन कार्ड असणे आवश्यक तसेच पांढरे रेशन कार्ड असल्यास किंवा कोणतेही रेशन कार्ड नसल्यास वार्षिक उत्पन्न रु. २.५० लाखापर्यंत असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.
- अर्जदाराचे हमीपत्र ( सर्वात खाली फोटो टाकलेला आहे तो सेव करून प्रिंट काढून घ्या )
- बँक खाते ( खाते आधार लिंक असावे )
- लाभार्थी महिलेचा फोटो
सदर योजनेचा अर्ज नारीशक्ती दूत मोबाईल app द्वारे भरणे आहे.
1) तुम्हाला सर्वात पहिले Google Play Store वरून " Narishakti Doot " या नावाचे APP Download करून घ्यायचे आहे.
2) APP Download झाल्या नंतर मोबाईल नंबर टाकून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून घ्याची आहे.
3) नारी शक्ती दूत App ओपन केल्यानंतर पुढील प्रमाणे आपल्याला Screen दिसेल.
४) तुम्हाल मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना यावर क्लिक करावे.
५) क्लिक केल्या नंतर तुमच्या समोर सदर योजनेचा फॉर्म दिसेल त्यामध्ये पुढील प्रमाणे माहिती भरावी.
1) महिलेचे संपूर्ण नाव ( आधार कार्ड प्रमाणे )
2) पतीचे / वडिलांचे नाव
३) महिलेचे लग्नापूर्वीचे नाव
४) जन्म दिनांक ( आधार कार्ड प्रमाणे )
५) अर्जदाराचा संपूर्ण पत्ता ( आधार कार्ड प्रमाणे )
६) जिल्हा , तालुका , गाव/शहर , ग्रामपंचायत / नगरपंचायत / नगरपालिका , पिन कोड ( हि सर्व माहिती टाकून घ्यावी)
७) मोबाईल क्र.
८) आधार क्रमांक ( अचूक नोंद करावी.)
९) शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का ? होय / नाही ( योग्य निवड करावी )
१० ) विवाहित स्थिती
११) महिलेचा जन्म परराज्यात झाला आहे का ? होय / नाही ( योग्य निवड करावी )
१२ ) वरील होय निवड केल्यास परराज्याचे नाव निवडावे
अर्दाराचे खाते असलेल्या बँकेचा तपशील
1) बँकेचे नाव
2) बँक खाते धारकाचे नाव
३) बँक खाते क्रमांक
४) IFSC कोड
५) आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडले आहे काय ? नसल्यास , आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न करण्यात यावा. होय / नाही ( योग्य निवड करावी )
खालील सर्व कागदपत्रे Upload करा.
वरील सर्व कागदपत्रे उपलोड झाल्या नंतर Accept हमीपत्र यावर क्लिक करून माहिती जतन करा यावर क्लिक करा. या नंतर तुमच्या समोर तुम्ही भरलेली संपूर्ण माहिती दिसेल ती माहिती पुन्हा तपासून घ्या त्यामध्ये काही बदल करावाचा असल्यास बदल करा या बटन वर क्लिक करा अन्यथा माहिती जतन करा . माहिती जतन झाल्या नंतर आपण नोंदविलेल्या नं वर OTP पाठविला जाईल तो OTP टाकून Verify करा. आता तुमचा फॉर्म यशवी रित्या जतन झाला तो तुम्हाला पुढील प्रमाणे दिसेल.
वरील फॉर्म एकदार जतन झाल्या नंतर तुम्ही फक्त त्या मध्ये एक वेळा बदल करू शकता. त्यामुळे फॉर्म काळजी पूर्वक भरा.
( अधिक माहिती शासन निर्णय पहा )
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: