संगणकाचे प्रकार | Types of Computer in Marathi

 

    संगणकाची आकारानुसार, कामाचा स्वरूपानुसार, आणि क्षमतेप्रमाणे अनेक प्रकार पडतात. संगणकाचे प्रकार आपण या लेखात पाहणार आहोत. त्याप्रमाणे संगणकाचे प्रकार खालील प्रमाणे पडतात.

१) रूपकात्मक संगणक ( Analog Computer ) :- 
Analog Computer

                रूपकात्मक संगणक यालाच इंग्रजी मध्ये Analog Computer असे म्हणतात. रूपकात्मक या शब्दाचा अर्थ ' साधर्म्य' दर्शविणे असा होतो. साधर्म्य या शब्दाचा अर्थ दोन गोष्टीमधील तुलना-पातळी दर्शविणे असा होतो या प्रकारातील संगणकाच्या साहाय्याने दोन गोष्टी मधील साधर्म्य (तुलना पातळी ) दर्शविले जाते. हे संगणक फक्त मोजणीचे कार्य करू शकतात याचे उत्तम उदाहरण सांगायचे झाल्यास ते पुढील प्रमाणे :- पाण्याच्या टाकीतील पाण्याची पातळी हि काट्याच्या सहाय्याने दर्शविली जाते. हे रूपकात्मक संगणकाचे उत्तम उत्तम उदाहरण आहे. परंतु हे संगणक फक्त मोजणी करत असल्यामुळे याच्या उपयोगात मर्यादा आहेत. 

२) डिजिटल संगणक ( Digital Computer ) :- 

                डिजिटल संगणक मध्ये प्रत्येक माहिती ० आणि १ च्या रुपात दर्शविली जाते यालाच बायनरी पध्दत असे म्हटल्या जाते. डिजिटल संगणकाची व्याख्या करायची झाल्यास ती पुढील प्रमाणे करता येईल  " ज्या संगणकामध्ये डाटा ( Data) डिजिटल Format मध्ये Store केला जातो, Process केला जातो व Output Digital Format मध्येच मिळते अशा संगणकाला डिजिटल संगणक असे म्हणतात. 

                डिजिटल संगणकामध्ये आदान व प्रदान हि साधने वापरली जातात. मुख्य भागाद्वारे संगणकाला पुरविलेल्या माहितीवर दिलेल्या सूचनेनुसार प्रक्रिया होत असेल. खूप गुंतागुंतीच्या आणि अडचणीच्या बाबी डिजिटल संगणकावर सोडविल्या जातात. दैनंदिन जीवनात याच संगणकाचा वापर केला जातो. या संगणकाचे वैशिष्ट्ये सागायचे झाल्यास संगकाची गती जास्त असून पुरविलेली माहिती संगणकात सुलभ पध्दतीने व बिनचूक साठवता येते. माणूस यावर चांगल्या प्रकारे कार्य करू शकतो. डिजिटल संगणक चे त्याच्या स्मृती आणि गती यावरून याचे विविध प्रकारात वर्गीकरण केले जाते ते पुढील प्रमाणे :-

i) सूक्ष्म / लहान संगणक ( Micro Computer ) :- 

                नावा प्रमाणेच हा संगणक आकाराने लहान असतो  परंतु या संगणकाचा आकार लहान असतो म्हणून याला सूक्ष्म / लहान संगणक ( Micro Computer ) असे म्हणत नाहीत तर हा संगणक मायक्रोप्रोसेसर ( Micro Processor ) ह्या तंत्रज्ञानावर आधारित असल्यामुळे या संगणकाला सूक्ष्म किंवा लहान संगणक ( Micro Computer ) असे म्हटला जाते विशेष म्हणजे ह्या संगणकाला CPU ( Central Processing Unit ) ची जोड असते CPU मध्ये मायक्रोप्रोसेसर बसविलेला असतो. सूक्ष्म संगणकाचा वापर व्यापार-व्यवसायापासून ते विविध क्षेत्रा मध्ये केला जातो. उदा. अभियांत्रिकी, वैद्यकीय इ. ह्या संगणकाचा वापर व्यक्तिगतरीत्या मनोरंजांसाठी, घरी छोटे मोठे प्रोजेक्ट करण्यासाठी वाणिज्य कार्यात, छोट्या छोट्या ऑफिस मध्ये तसेच थोड्या प्रमातील Data Store करण्यासाठी Micro Computer वापरले जातात. सूक्ष्म संगणकावर एकावेळी फक्त एकाच व्यक्ती त्यावर काम करेल अशा पध्दतीने बनविलेला आहे. 

                सूक्ष्म संगणक याचे खालील एक उत्तम उदाहरण आहे.

अ ) वैयक्तिक संगणक ( Personal Computer ) :- 

                जरी हे संगणक क्षमतेने सर्वात कमी असले तरी सर्वात जास्त ठिकाणी व्यक्तिगत स्वरुपात वापरले जाणारे हेच संगणक आहे. म्हणून या संगणकांना Personal Computer (PC) असे म्हणतात. हा संगणक व्यावसायिक, कार्यालय, लहान व्यापारी इ. ठिकाणी वापरण्यात येतो. हा संगणक आकाराने लहान असल्यामुळे टेबलावर ठेवता येतो. PC, Notebook, laptop. हे संगणक ह्याच प्रकारात मोडतात.

ii) मिनी संगणक (Mini Computer) :-

                 मिनी संगणकाचा आकार सूक्ष्म संगणकापेक्षा मोठा परंतु मेनफ्रेम संगणकापेक्षा लहान असतो. साधारणत : मध्यम Economy Group मधील कंपनी या प्रकारचे संगणक वापरतात. या संगणकाचा आकार के टेबला ऐवढा असतो ह्यावर एकापेक्षा जास्त व्यक्ती एकाच वेळेस काम करू शकतात. ह्या संगणकाची माहितीवर प्रक्रिया करण्याची गती तसेच हे संगणक किमतीला देखील मायक्रो संगणकापेक्षा जास्त असते. ह्या संगणकावर एकापेक्षा अनेक व्यक्ती कार्य करतात. ह्या संगणकाची गती जलद असून ह्यात मोठ्या प्रमाणावर माहिती साठवून ठेवता येते. १९६५ मध्ये पहिला मिनी संगणक उदयास आला. या संगणकाचा उपयोग सरकारी कार्यालये, वाहतूक आरक्षण करण्यासाठी, वित्तीय लेखांकनासाठी, नियोजनासाठी, मध्यम आणि मोठ्या आकाराची प्रमंडळे, विमा कंपन्या मध्ये ह्याच संगणकाचा उपयोग करण्यात येतो. जलद गट, साठवणूक क्षमता हि ह्या संगणकाची वैशिष्ट्ये आहेत.

३) मेनफ्रेम संगणक ( Main Frame Computer ) 

                मेनफ्रेम संगणकाला सुरुवातीच्या काळात ह्या संगणकच्या बांधणीसाठी धातूचे जे Cabinet वापरले जात असतात म्हणून या संगणकाला मेनफ्रेम संगणक असे म्हटल्या जाते. मेनफ्रेम संगणकाची क्षमता सुपर संगणक पेक्षा तुलनात्मक कमी असते. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास आज मिनी संगणकापेक्षा मोठ्या परंतु सुपर संगणका पेक्षा लहान संगणकाला मेनफ्रेम संगणक ( Main Frame Computer) असे म्हणतात. हे संगणक आपल्या गती आणि जास्त प्रमाण साठवण क्षमते मुले प्रसिद्ध आहेत. एकाच वेळेस अनेक व्यक्ती ह्या संगणकावर विविध प्रकारची कार्ये करू शकतात. 

            मेनफ्रेम संगणक हे मोठ्या प्रमाणातील डाटा स्टोर किंवा संग्रहणासाठी वापरले जातात. उदा. बँक, विमा कंपनी. 


उर्वरित माहिती लवकरच उपलब्ध करण्यात येईल .

संगणकाचे प्रकार | Types of Computer in Marathi संगणकाचे प्रकार | Types of Computer in Marathi Reviewed by Total Knowledge on जुलै ११, २०२१ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.