आपल्या SMS चा बॅकअप मोबाईल वरून आपल्या जीमेल अकाउंटवर घेणे शिका
SMS म्हणजेच Short Message Services, आज SMS चा वापर खूप कमी झाला आहे. तरी पण त्याचे महत्व
पण खूप आहे. आज व्हाट्सअप, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, आणि अश्या अनेक प्रकारच्या आप्लिकेशनचा आजच्या काळात खूप
मोठ्या प्रमाणात उपयोग होत आहे. आता SMS चा जमाना गेला आहे, असे असले तरी आज पण
आपल्या मोबाईल फोन मध्ये काही अतिमहत्वपूर्ण SMS
असतात. या SMS चा बॅकअप नेहमीसाठी नाही घेतला जाऊ शकत. परंतु असे
असले तरी SMS चा बॅकअप आपण आपल्या
जीमेल वर घेऊ शकतो. त्यासाठी तुमच्या कडे स्मार्टफोन (अँड्रॉइड ) असणे आवश्यक आहे.
त्यासाठी तुम्हाला खालील स्टेप फॉलो
करायचे आहे.
→अँड्रॉइड फोन वर SMS बॅकअप घेण्यासाठी तुमच्या कडे जीमेल चे
अकाउंट असणे आवश्यक आहे. जर तुमच्या कडे जीमेल अकाउंट नसेल तर इथे क्लिक करा.
→त्यानंतर
तुम्हाला तुमच्या अँड्रॉइड फोन वरील गूगल प्ले स्टोर वर जाऊन SMS Backup+ हे अँप्लिकेशन फ्री
मध्ये डाउनलोड करून घ्या.
→त्यानंतर
SMS Backup+ अँप्लिकेशन ओपन
करा.
→तिथे
तुम्हाला बॅकअप नावाचे बटन दिसेल. त्या ठिकाणी टॅब करा.
→टॅब
केल्यानंतर तुमच्या फोन मधील SMS
बॅकअप
जीमेल वर घेणे सुरु होईल. आणि काही मिनटात हि प्रक्रिया पूर्ण होईल.
→प्रक्रिया
पूर्ण झाल्यानंतर तुम्ही तुमच्या
जीमेल वर SMS चा बॅकअप पाहू
शकता. .
→तसेच
त्या अँप्लिकेशन मध्ये एक Auto
Backup नावाचे एक टॅब आहे. त्या टॅबचा उपयोग केल्यास तुमच्या फोन वर येणारे
नवीन SMS चा ऑटोबॅकअप
तुमच्या जीमेल वर होऊन जाईल.
आपल्या SMS चा बॅकअप मोबाईल वरून आपल्या जीमेल अकाउंटवर घेणे शिका
Reviewed by Total Knowledge
on
मे १३, २०२०
Rating:

nice blog
उत्तर द्याहटवामाझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद !
हटवा