संगणकाची वैशिष्ट्ये | Characteristics Of Computer in Marathi


संगणकाची वैशिष्ट्ये ( Characteristics Of Computer in Marathi )



                 आज संगणकाचा उपयोग अनेक क्षेत्रात होत आहे. आज असे एकही क्षेत्र नाही जिथे संगणकाचा उपयोग नाही, शैक्षणिक क्षेत्र असो कि आर्थिक क्षेत्र प्रत्येक ठिकाणी संगणकाचा उपयोग केला जात आहे. कारण संगणकाची स्वतः ची अशी काही महत्वाची पण खास वैशिष्ट्ये आहेत, ती खालील प्रमाणे :- 

1) गती (Speed)

          गती  हे संगणकाचे मुख्य वैशिष्ट्ये आहे. गतीमुळेच  संगणकाचा आधुनिक काळात विकास झाला आहे. मानव जे काम १ महिन्यात पूर्ण करेल तेच काम संगणक काही सेकंदात पूर्ण करतो म्हणजेच मानवाच्या काम करण्याचा वेगापेक्षा संगणकाचा काम करण्याचा वेग कितीतरी पटीने जास्त आहे. ह्यावरून संगणकाच्या गतीची आपल्याला कल्पना येऊ शकते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे, मानवाला जर आकडेमोड करायचे असतील तर मानवाला भरपूर प्रमाणात वेळ लागतो आणि अचूकता पण कमी राहते परंतु हेच काम जर संगणकावर केले तर काही सेकंदात पूर्ण होईल आणि तेही अचूक पणे, संगणक एका सेकंदात तीन ते साडेतीन लक्ष आकडेमोड करू शकतो. संगणकाच्या वेगाला किंवा गतीला Blinding Rate असे सुद्धा म्हटले जाते. संगणकाचा वेग " मायक्रोसेकंद, नॅनोसेकंद, तसेच पिसोसेकंद, मध्ये मोजला जातो.

२) स्मृती ( Memory )

           स्मृती हे संगणकाचे दुसरे अतिमहत्वपूर्ण वैशिष्ट्ये आहे. मानवाची स्मरण शक्ती मर्यादित आहे. मानव स्मरणात माहिती जास्त वेळ साठवून ठेऊ शकत नाही, कालांतराने तो विसरून जातो पण संगणकाचे मात्र तसे नाही. संगणकाची स्मरण शक्ती खूप जास्त प्रमाणात आहे. तो आपल्या स्मरणात दीर्घकाळ पर्यंत माहिती साठवून ठेऊ शकतो, आणि उपयोग कर्त्याला पाहिजे तेव्हा उपलब्ध करून देऊ शकतो. असे जरी असले तरी संगणकाची स्मृती काही प्रमाणात मर्यादित सुद्धा आहे. उदा. जर संगणकाची स्मृती २ GB असेल तर २ GB पेक्षा जास्तही माहिती साठवली जाऊ शकत नाही. असे असले तरी स्मृती हे संगणकाचे वैशिष्ट्ये आहे.

३) पुनरावृत्ती क्षमता ( Repetitiveness )

          एखाद्या मानवाला जर एकच काम आयुष्य भर परत परत करायला सांगितले तर सुरुवातीला काम वेगात आणि अचूक होईल मात्र कालांतराने वेग पण मंदावेल आणि अचूकता पण कमी होईल, परंतु संगणकाचे असे नाही. संगणकास परत परत तेच काम करायला सांगितले तरीही संगणक ते काम त्याच वेगाने व कार्यक्षमतेने करीत असतो तसेच अचूकता पण तीच असते. म्हणून पुनरावृत्ती क्षमता संगणकाचे प्रमुख वैशिष्ट्ये आहे.

४) पुनः प्रसारण

         संगणकात माहिती साठवून ठेवण्याची क्षमता आहे तसेच ती माहिती संगणक चालकाला पाहिजे तेव्हा उपलब्ध करून देण्याची क्षमताही संगणकात आहे. उदा. जी माहिती संगणकात साठवली आहे ती माहिती वापरकर्त्याला पाहिजे असल्यास संगणक ती माहिती मागताक्षणीच जशीच्या तशीच पुनः प्रक्षेपित करतो. हि माहिती पुन्हा पाहता येते, त्यात जर काही बदल किंवा दुरुस्ती करायची असेल ती पण करता येते, व पुन्हा ती माहिती साठवून ठेवता येते. संगकात साठवलेली माहिती कितीही वेळा पाहता येते तरीही संगणक त्या माहितीचे जसेच्या तसेच पुनः प्रसारण करते.

५) अष्टपैलुत्व ( Versatility )

          संगणक अष्टपैलू आहे. तो फक्त एकच काम करीत नाही तर वेगवेगळ्या प्रकारची कामे संगणक करू शकतो ते पुढील प्रमाणे :-
         ➡️   बँक व्यवहार.
         ➡️   चित्र काढणे.
         ➡️   चित्र रंगविणे.
         ➡️   नकाशे तयार करणे.
         ➡️   आलेख तयार करणे.
         ➡️   हिशेब ठेवणे.
         ➡️   संदेशवहन करणे.
         ➡️   पत्र लेखन.
         ➡️   गप्पागोष्टी करणे.
         ➡️   मनोरंजन.
         ➡️   तुलना करणे.
         ➡️   गणना करणे.
         ➡️   वेबसाईट बनवणे.
             संगणक वरील कामे करतो त्यामुळेच संगणक अष्टपैलू आहे आणि त्याने मानवाचे जीवन सुखमय व समृद्ध केले आहे.

६) अचूकता (Accuracy)

           संगणक कोणतेहि कार्य मानवापेक्षा अचूक पणे करतो, म्हणून अचूकता हे संगणकाचे महत्वाचे वैशिष्ट्ये आहे.  संगणकाला दिलेले कार्य अतिशय अचूकपणे करीत असतो संगणकाचा काम करण्याचा वेग जरी जास्त असला तरी पण संगणक काम बिनचूक करीत असतो. संगणक स्वःताहुन कोणतीही चूक करीत नाही. संगणकाच्या कामाची अचूकता हि मानवाचा अचूकतेपेक्षा खूप जास्त असते. संगणकाला जर आकडेमोड करायला सांगितले तर संगणक ते कार्य प्रचंड वेगात आणि अचूक पणे करतो, परंतु तेच काम जर मानवी श्रमाने केले तर वेग पण कमी अचूकता पण कमी म्हणून अचूकता संगणकाचे महत्त्वाचे वैशिष्ट्ये आहे.

7) कष्टाळूपणा

           संगणकाला कोणतेही कार्य करायला सांगितले तर संगणक कधीच कंटाळुपणा करत नाही. मानवा प्रमाणे तो कंटाळत नाही. एकच कार्य कितीही वेळा आणि कितीही दिवस करायला सांगितले तरीही काम त्याच वेगात होते त्यात काही फरक पडत नाही आणि अचूकता पण तीच राहते. तसेच संगणक सतत कार्य करीत राहिला तर तो थकत पण नाही. म्हणून कंटाळुपणा हा गुणधर्म संगणकामध्ये नाही.

८) माहितीचे संचारण (Transmission of Information)

            संगणकाचा विकासामध्ये इंटरनेट ने भर टाकली. इंटरनेट शिवाय आधुनिक संगणकाची संकल्पना करणे योग्य ठरणार नाही. इंटरनेट मुळे संगणकाच्या विकासाला एक उत्तम गती मिळाली आहे. इंटरनेटच्या माध्यमातून माहितीचे दळणवळण खूप मोठ्या प्रमाणात सोपे झाले. जगातील कोणतीही माहिती एखाद्या व्यक्तीला पाहिजे असल्यास तो इंटरनेटच्या माध्यमातून मिळू शकते आणि तेही कमी वेळात आणि कमी खर्चात, माहितीच्या संचारणात संगणकाने आणि इंटरनेटने खूप मोठ्या प्रमाणात भर टाकली.

श्या प्रकारे संगणकाचे  वैशिष्ट्ये सांगण्यात येतात.



                   


संगणकाची वैशिष्ट्ये | Characteristics Of Computer in Marathi संगणकाची वैशिष्ट्ये | Characteristics Of Computer in Marathi Reviewed by Total Knowledge on सप्टेंबर १८, २०१९ Rating: 5

३ टिप्पण्या:

Blogger द्वारे प्रायोजित.