संगणकाची उपयुक्तता | Applications of Computer in marathi


संगणकाची उपयुक्तता |Applications of Computer

                    जेव्हा संगणकाची निर्मिती झाली तेव्हा संगणक या उपकरणाचा वापर मुख्यतः आकडे मोड करण्यासाठी केला जात होता. परंतु आता दिवसेंदिवस संगणक या उपकरणामध्ये अनेक सुधारणा होत गेल्या आणि आता संगकाचा वापर अनेक कामासाठी तसेच विविध क्षेत्रा मध्ये  होत आहे. या मध्ये WWW ने  आपले मोलाचे योगदान दिले. आज असे एकही क्षेत्र नाही जेथे संगणकाचा उपयोग केला जात नसेल. त्यामधील काही क्षेत्र खालील प्रमाणे :- 


संगणकाची उपयुक्तता | Applications of Computer in marathi


१) शैक्षणिक क्षेत्र :-

     आधुनिक संगणकाने शैक्षणिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात भर टाकली. आता विद्यार्थींचे ऑनलाईन फॉर्म भरणे असो कि, ऑनलाईन परीक्षेचे निकाल पाहणे असो हे काम आता संगणकावर केले जाते. तसेच विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती चे फॉर्म सुद्धा आता WWW च्या मदतीने संगकावर भरल्या जातात. शाळा, महाविद्यालयाचे काम संगणकावर केले जात आहे. उदा. विद्यार्थ्यांच्या नावांची यादी बनवणे, विद्यार्थ्यांचे गुण प्रकाशित करणे, हिशोब करणे, हॉल तिकीट तयार करणे, इत्यादी कामे केल्या जातात. संगकामुळे सीडीच्या माध्यमातून शालेय, महाविद्यालयीन विषय शिक्षकाशिवाय शिकवता येतात. शाळा - महाविद्यालयातील कार्यालयाचे, ग्रंथालयाचे काम संगणकावर केले जातात.



२) आर्थिक क्षेत्र :-


         संगणकाचा आर्थिक क्षेत्रात सुद्धा फार मोठ्या प्रमाणात उपयोग केला जात आहे. उद्योगधंदे, लहान व्यापार, मोठा व्यापार, विविध व्यवसाय इत्यादीमध्ये संगणकाचा वापर केला जातो. या व्यवसाय मध्ये संगणकाद्वारे हिशेब ठेवणे, आर्थिक विवरण तयार करणे, ताळेबंद तयार करणे, बिल्स बनवणे, सामान्यांची यादी तयार करणे, इ. कामे केले जातात.आधुनिक काळात तर संगणकाने मोठी भर टाकली. याचे जिवंत उदाहरण ई-कॉमर्स आहे. ई-कॉमर्स च्या विकासाठी संगणकाचे मोलाचे योगदान आहे. 



३) जाहिरात क्षेत्र :-

         आजच्या युगात अनेक वस्तू उत्पादित केल्या जातात. परंतु त्या वस्तूची ग्राहकांना माहिती असेलच असे नाही. त्यासाठी विविध कंपन्या आपल्या उत्पादित वस्तूची जाहिरात करतात. कंपन्या आपल्या उत्पादित वस्तूची जाहिरात संगणकावर निर्माण करतात आणि वेवसाईटवर प्रदर्शित करतात. जर उदाहरण सांगायचे झाल्यास You tube आणि विविध वेबसाईटवर कंपन्यांचा आपल्याला जाहिरात दिसतात आणि हे संगणकामुळे शक्य झाल आहे. इतकेच नाही तर पेमेंटसुद्धा संगणकाच्या सहाय्याने करता येते. ह्यामुळे वेळ वाचतो व कार्यात तत्परता येते.



४) विमा क्षेत्र :-

        विमा क्षेत्राने संगणकाचा वापर करून आपल्या कार्यात तत्परता निर्माण केली आणि आपला विकास केला आहे. आता विमा क्षेत्र पुढील प्रमाणे कार्य संगणकावर करतात. विमेदाराची माहिती अद्यावत ठेवणे, विम्याचे हप्ते, देय दिनांक, हप्ताची परतफेड, इ. माहिती संगणकावर अद्यावत ठेवता येते व पाहिजे तेव्हा आपल्याला घेता येते. तसेच ऑनलाईन रक्कम भरण्याची सुविधा सुद्धा विम्या कंपन्यांनी आपल्या विमाधारकांना दिली.



५) बँकिंग क्षेत्र :- 

         बँकिंग क्षेत्राच्या विकासात संगणकाने मोठी भर टाकली. खात्यातून पैसे काढणे, खात्यात पैसे टाकणे, चेक तयार करणे, बँकेचे लेखे तयार करणे, एका खात्यातून दुसऱ्याचा खात्यात पैसे पाठवणे, खातेदारांची यादी बनवणे, गणना करणे,  इत्यादी कामे संगणकाच्या द्व्यारे केली जातात. आधुनिक काळात बँकेतील खातेधारकांना आपल्या खात्यातून पैसे काढण्याची २४ तास सोय केली आहे आणि याचे ATM मशीन हे एक उत्तम उदाहरण आहे. ATM चा फुल फॉर्म ऑटोमेटेड टेलर मशीन  (Automated Teller Machine) असा होतो.



६) वाहतूक क्षेत्र :- 

      संगणकाच्या  वापरासाठी वाहतूक क्षेत्र सुद्धा मागे राहिले नाही. ऑनलाईन तिकीट बुक करणे, ड्रायविंग लायसन्स तयार करणे, गाडीची स्तिथी तपासणे, गाडी परवाना धारकांची यादी तयार करणे इत्यादी कामे संगकावर केली जातात.



७) क्रीडा क्षेत्र :-

           आज आपल्याला  अमेरिकेत चालू असलेल्या खेळ भारतात पाहायला मिळतो. हे संगणकाच्या वापरामुळे शक्य झाल आहे. संगणकावर विविध खेळ सुद्धा खेळता येतात. एखाद्या खेळा विषयी आपल्याला माहिती पाहिजे असेल तर ती माहिती WWW च्या सहाय्याने संगकावर मिळते तसेच नियम आणि अटी सुद्धा पाहता येतात. देश विदेशातील खेळाडूंची माहिती सुद्धा पाहता येते. 



८) ज्योतिष क्षेत्र :-

      संगकावर आपली जन्म कुंडली तयार करून ती आपल्याला पाहता येते. 



९) सरंक्षण क्षेत्र  :- 

        संरक्षण क्षेत्रात संगणकाला फार महत्व प्राप्त झाले आहे. शत्रूच्या हालचालीवर नजर ठेवणे असो कि त्यांची माहिती मिळविणे असो हे कार्य संगणकाद्व्यारे केली जातात. 



१०) इंजिनिअरिंग क्षेत्र :-

         नकाशे तयार करणे, घराचे नकाशे तयार करणे, धरणांचे नकाशे तयार करणे, वस्तू उत्पादनापूर्वीच वस्तूचे रंग - रूप पाहणे, त्यात योग्य ते बदल करणे, मोठमोठे आलेख काढणे, आवश्यकता असल्यास बदल करणे इत्यादी कामे संगकावर केली जातात. 



         याचप्रमाणे संगणकाचा उपयोग वैद्दकिय क्षेत्र, पर्यटन क्षेत्र, हवामान क्षेत्र, प्रकाशन क्षेत्र, माहिती क्षेत्र अशा अनेक विविध क्षेत्रात केला जातो. 

संगणकाची उपयुक्तता | Applications of Computer in marathi संगणकाची उपयुक्तता | Applications of Computer in marathi Reviewed by Total Knowledge on सप्टेंबर १०, २०१९ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.